श्रेया बुगडे बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Shreya Bugde Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

श्रेया बुगडे ( Shreya Bugde )

श्रेया बुगडे हे मराठीतल्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध व अष्टपैलू अभिनेत्री चे नाव आहे. श्रेयाचा जन्म २ फेब्रुवारी १९८८ रोजी पुण्यात जरी झाला असला तरी  तिचे शिक्षण व करियर मुंबईत घडले आहे. सध्या झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेट वर एकमेव महिला कलाकार म्हणून काम करत आहे.

मुळात तिची कारकीर्द अगदी लहान वयात सुरू झाल्यामुळे तिला अभिनयाचा खूप मोठा अनुभव आहे. श्रेया बुगडे’ अगदी शालेय जीवनापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती. तिने रंगभूमीपासून सुरुवात केली आणि सध्या ती टेलिव्हिजनवर यशस्वी आहे. श्रेयाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता हि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळेच मिळाली.

कलाकाराला आपण  केलेल्या कामाच्या कौतुकासाठी बरेच पुरस्कार दिले जातात. आणि त्याच पुरस्कारांपैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे ‘आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार. २०२१ चा हा पुरस्कार श्रेयाला आपल्या उत्तम अभिनयासाठी मिळाला आहे.  श्रेया ही तिच्या सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने  या पुरस्काराची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना सांगितली होती.

श्रेया बुगडे बायोग्राफी | Shreya Bugde Biography

नाव                   –           श्रेया बुगडे         

व्यवसाय            –           मराठी अभिनेत्री , विनोदी कलाकार  

जन्मतारीख         –           २ फेब्रुवारी, १९८८

जन्मदिवस –                 मंगळवार

जन्म स्थळ          –           पुणे, महाराष्ट्र (भारत)  

राहण्याचे ठिकाण –          मुंबई, महाराष्ट्र (भारत)

वय-                  –           ३४ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व          –           भारतीय

जन्म रास           –           कुंभ  

धर्म                   –           हिंदू

प्रमुख टीव्ही कार्यक्रम –    चला हवा येऊ द्या

श्रेया बुगडे फॅमिली । Shreya Bugde Family

श्रेया ही मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदी अभिनय करणारी एक अभिनेत्री आहे. तिच्या वडिलांचे नाव अरुण बुगडे आणि आईचे नाव नूतन बुगडे असून तिला एक तेजल मुखर्जी नावाची बहीण  देखील आहे. आम्हाला तिच्या भावाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. श्रेया विवाहित आहे श्रेयाचा  विवाह 2७ डिसेंबर २०१४ रोजी झाला.

आईचे नाव         –           नूतन बुगडे

वडिलांचे नाव      –           अरुण बुगडे

बहीण                –           तेजल बुगडे-मुखर्जी

वैवाहिक स्तिथी   –           वैवाहिक

पती                   –           निखिल शेठ

छंद                   –           फिरणे, नृत्य करणे, गाणी ऐकणे आणि शॉपिंग करणे.

श्रेया बुगडेच्या काही आवडीच्या गोष्टी  | Shreya Bugde Favorite Things

अभिनेता           –           शाहरुख खान आणि सलमान खान

अभिनेत्री           –           माधुरी दीक्षित

Shreya Bugde Physical Stats

उंची                 –           १५७ सेमी

वजन                –           ५३ किलो

डोळ्यांचा रंग    –           काळा

केसांचा रंग      –           काळा

श्रेया बुगडे नेटवर्थ  (Shreya Bugde Net Worth)

श्रेया बुगडेची(Shreya Bugde Net Worth) एकूण संपत्ती 1 दशलक्ष  – 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

श्रेया बुगडे शिक्षण  (Shreya Bugde Education)

शाळा                –           सेंट झेविअर्स हाय स्कूल, मुंबई .

श्रेया बुगडे शिक्षण हे सेंट झेविअर्स हाय स्कूल, मुंबई मधून झाले आहे.

महाविद्यालय     –           मिठीबाई कॉलेज, जुहू, मुंबई.  

श्रेयाने आपले ग्रॅजुएशन मिठीबाई कॉलेज, जुहू, मुंबई मध्ये केलेले आहे. तसेच Advertising & PR course Welingkar Institute मधून पूर्ण केलेले आहे.

श्रेया बुगडे उंची  (Shreya Bugde Height)

श्रेया बुगडे यांची उंची १५७ सेमी इतकी आहे.

श्रेया बुगडे विवाह (Shreya Bugde wedding)

श्रेया आणि निखिल या दोघांची ओळख एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रीकरणादरम्यान निखिल अनेकवेळा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. निखिल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असेलली गुंतता हृदय ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली. तेव्हा त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी श्रेयाने फोन केला. त्यांचे फोन वरील बोलणे वाढत गेले आणि दोघांच्या एका वेगळ्या नात्याची सुरुवात होत गेली. त्या दोघांमधली मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं प्रेमात रूपांतर पुढे प्रेमात झालं.

श्रेयाने २७ डिसेम्बर २०१४ साली निखिलशी लग्न केल. निखिल शेठ हे झी मराठी चे क्रिएटिव्ह हेड आहेत. ते सुद्धा पुण्याचेच आहेत. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. 

श्रेया बुगडे वय (Shreya Bugde age)

श्रेया बुगडे हिचा जन्म २ फेब्रुवारी, १९८८ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय ३४ वर्ष (२०२२) आहे.

श्रेया बुगडे आणि टॅटू (Shreya Bugde tattoo)

श्रेया बुगडेचे टॅटूवरचे प्रेम सर्वश्रुत आहे. श्रेयाच्या पाठीवर दुर्गादेवीचा टॅटू आहे तसेच तिच्या हातावर पुतणीच्या नावाचा टॅटू काढला आहे आणि नुकताच तिच्या मनगटावर नवीन टॅटू काढला आहे. श्रेयाने तिच्या चाहत्यांना टॅटूच्या छोट्या डिझाइनने अगदी मोहित केलेले आहे. जे लहान परंतु आकर्षक आहे. श्रेयाने तिच्या टॅटूचा छानसा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे.

श्रेया बुगडे चित्रपट आणि टीव्ही मालिका (Shreya Bugde movie and serials list)

श्रेया एक अष्टपैलू अभिनेत्री आहे जिची कॉमिक टाइमिंग चांगली आहे. श्रेया ही एक मनमोकळी आणि  खूप चांगली अभिनेत्री असून ती सगळ्या प्रकारच्या भूमिका अगदी छान प्रकारे करते. या सगळ्या मुळेच श्रेया हि प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. श्रेयाने बऱ्याच मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलेले आहे. तिने अनेक लघुपटांमध्येही काम केले आहे.

चला हवा येऊ द्या या शो मधून श्रेया हि महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. निलेश साबळे या कार्यक्रमाचा होस्ट आहे. निलेश एका एपिसोडसाठी जवळपास 1. 5 लाख रुपये मानधन घेतो.  भाऊ कदम आणि श्रेया बुगडे हे दोघेही चला हवा येऊ द्या या शो चा महत्वाचा भाग आहेत. हा कार्यक्रम सतत रसिक मनांचं मनोरंजन करत आहे. न थकता, न चुकता अविरत पणे  यातील कलाकार  कुशल बद्रिके,भाऊ कदम, ,श्रेया बुगडे, गणेश भारतपुरे, सागर कारंडे, डॉ.निलेश साबळे आपले मनोरंजन करत आहेत. या सहा जणांची टीम आजतागायत कायम राहिली ते त्यांच्यातील उत्तम ट्युनिंगमुळेच.

श्रेया बुगडे मालिका

तू तिथे मी

फू बाई फू

चला हवा येउ द्या

अस्मिता माझे मन तुझे झाले

छुट्टा छेडा – गुजराती मालिका

थोडा है बस थोडे की जरूरत है – हिंदी

फू बाई फू

नया है ये

श्रेया बुगडे नाटक

जो भी होगा देखा जायेगा

समुद्र

मेधा आणि इंग्रजीत झूमबीश

तिने काही शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले आहे.

कृपया हे पण वाचा सोनाली कुलकर्णी

FAQs

श्रेया बुगडे उंची किती?(Shreya Bugde Height)

श्रेया बुगडेची उंची १५७ सेमी इतकी आहे.

श्रेया बुगडे कास्ट – रिलिजन? (Shreya Bugde Cast – Religion)

हिंदू

श्रेया बुगडेची आई कोण आहे? (Who is Shreya Bugde mother?)

नूतन बुगडे (Nutan Bugde)

1 thought on “श्रेया बुगडे बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Shreya Bugde Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more”

Leave a Comment