मकरंद अनासपुरे बायोग्राफी – वय, उंची, फॅमिली, पत्नी, आणि इतर । Makarand Anaspure Biography in Marathi – Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

मकरंद अनासपुरे  (Makarand Anaspure)

मकरंद अनासपुरे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे  विनोदी अभिनेते  आहेत. ते मराठवाडयातील असुन त्यांनी औरंगाबाद येथून स.भु महाविद्यालयातुन नाटयशास्त्र विभागात अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतले. अभिनयाची जास्त आवड असल्याने कॉलेज जिवनातहि त्यांनी अनेक नाटकांमधे काम केले. आपल्या निरागस वेगळया अभिनयामुळे आणि संवादफेकीच्या चातुर्या मुळे मकरंद अनासपुरे हे मराठी रसिकांच्या गळयातील ताईत बनले. लक्ष्मीकांत बेर्डे नंतर मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिकांचा वारसा पुढे नेणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे.

मकरंद अनासपुरे बायोग्राफी (Makarand Anaspure Biography in Marathi)

नाव                  –            मकरंद मधुकर  अनासपुरे

टोपण नाव        –           तुक्या

व्यवसाय           –          मराठी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

जन्मतारीख       –          २२ जून १९७३

जन्मदिवस        –          शुक्रवार

जन्म स्थळ        –          बिडकीन , औरंगाबाद ( महाराष्ट्र , भारत )

वय                   –           ४९ ( २०२२ )

नागरिकत्व        –           भारतीय

जन्म रास           –          सिंह

धर्म                   –           हिंदू

मकरंद अनासपुरे फॅमिली । Makarand Anaspure Family

आईचे नाव        –           माहिती अस्तिस्त्वात नाही

वडिलांचे नाव    –           मधुकर अनासपुरे

भाऊ , बहीण     –           माहिती अस्तिस्त्वात नाही

वैवाहिक स्तिथी –           विवाहित

पत्नी                  –           शिल्पा अनासपुरे

लग्न दिनांक       –        २००१

मुलगी              –           २

मकरंद अनासपुरे -काही आवडीच्या गोष्टी  | Makarand Anaspure Favourite Things

अभिनेता                       –          नाना पाटेकर

अभिनेत्री                      –          करीना कपूर

आवडता गायक            –          अजय-अतुल

आवडता रंग                 –          लाल

छंद                              –           अभिनय

आवडता खेळाडू         –          सचिन तेंडुलकर

आवडते खाद्य              –           ठेचा भाकरी

Makarand Anaspure Physical Stats

उंची                 –            १६३ सेमी

वजन                –           ६५ किलो

डोळ्यांचा रंग   –          काळा

केसांचा रंग      –            काळा

मकरंद अनासपुरे शिक्षण  (Makarand Anaspure Education)

शाळा                – मकरंद अनासपुरे बिड मध्ये प्राथमिक शिक्षण झाले

महाविद्यालय      – सरस्वती भवन महाविद्यालय, संभाजीनगर
                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, संभाजीनगर

मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट – Makarand Anaspure Movies

आपल्या अखंड करिअरमध्ये मकरंद यांनी बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. हिंदी, भोजपुरी सिनेमा, टीव्ही होस्ट, रायटर, डिरेक्टर, प्रोड्यूसर अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये निभावल्या आहेत.

मकरंद अनासपुरे यांनी बऱ्याच मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांनी कायद्याचं बोला, जाउ तिथे खाउ, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, तुक्या तुकविला नाग्या नागविला, गाढवाचं लग्नं, नाथा पुरे आता, नागपुर अधिवेशन, पारध, असा मी तसा मी, डॅंबीस, नाना मामा, सगळे करून भागले, अगडबम, बापरे बाप डोक्याला ताप, फुल 3 धमाल, दे धक्का या चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

तसेच अंगारकी, सरकारनामा, सातच्या आत घरात, सावरखेड: एक गाव, नऊ महिने नऊ दिवस, खबरदार, शुभमंगल सावधान, तुला शिकवीन चांगलाच धडा, साडे माडे तिन, जबरदस्त, फुल 3 धमाल, ऑक्सिजन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, निशाणी डावा अंगठा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, उलाढाल, अरे देवा, हापुस, डावपेच, गुलदस्ता.या चित्रपटात काम केले. त्यांनी विनोदी भूमिकांसह अनेक प्रकारच्या  बहुरंगी भूमिका चित्रपटांमध्ये केल्या आहेत. मकरंद अनासपुरे यांनी कित्येक चित्रपटात काम केले आहे. पण त्यांचा सर्व प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘ गाढवाचं लग्न.

मकरंद यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले.

विशेष म्हणजे त्यांची पत्नी शिल्पा अनासपुरे हि सुद्धा एक अभिनेत्री आहे. त्यांनी शिल्पा सोबत कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकाविला नाग्या नाचविला, सुम्बरान, गोष्ट छोटी डोंगर एव्हढी या चित्रपटात एकत्र काम केलं.

मकरंद अनासपुरे यांनी काही नाटकातही कामं केली.  टुर टुर, जाऊ बाई जोरात, टिकल ते  पॉलिटिकल असे अनेक नाटके मकरंद अनासपुरे यांनी केली आहेत. जाऊ बाई जोरात या नाटकाचे प्रयोग करत असणातानाच  त्यांची भेट शिल्पाशी झाली आणि नंतर यांच मुलीसोबत मकरंद यांनी लग्न केले.

मकरंद यांनी ‘ पिंजरे वाली मुन्निया ‘ नावाच्या भोजपुरी चित्रपटात सुध्दा अभिनय केला आहे.

मकरंद अनासपुरे यांनी एका Om My Friend Ganesh या  Animated Hindi Movie मध्ये पण काम केले आहे

मकरंद यांनी नुकत्याच आलेल्या राणबाजार ह्या वेबसिरीज मध्ये हि काम केल होत.

नाना पाटेकरांसारख्या यशस्वी, प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्याच्या सांगण्यावरूनच मकरंद अनासपुरे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मुंबई गाठली होती म्हणून मकरंद आपल्या अभिनय क्षेत्रातील यशाचे सर्व श्रेय  नाना पाटेकर यांना देतात.

मकरंद अनासपुरे यांना मिळालेले पुरस्कार (Makarand Anaspure Awards)

मकरंद अनासपुरे यांना बऱ्याच पुरस्काराने सन्मानित केले आहे.

१. बीडच्या रोटरी क्लबचा चंपावतीरत्‍न पुरस्कार

२. बाणेर (पुणे)च्या योगिराज सहकारी पतसंस्थेतर्फे ’योगिराज भूषण पुरस्कार’.( २०१५ )

३. गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार ( २०१५ )

४. सह्याद्री प्रतिष्ठानचा श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार

Please read श्रेया बुगडे बायोग्राफी (SHREYA BUGDE Biography in Marathi)

नाम फाउंडेशन आणि मकरंद अनासपुरे – Naam Foundation

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर हे दोन्ही मुळचे शेतकरी कुटुंबातले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी एकत्र येऊन सप्टेंबर २०१५ मध्ये आपल्या नावातील आद्याक्षराने एकमेकांच्या सोबतीने  नाम फाउंडेशन या  एका सामाजिक संस्थेची पायाभरणी केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांकरीता, कुटुंबा करिता आणि एकुणच शेतकऱ्यां करता  कार्य करणारी महाराष्ट्रातील नाम ही एकमेव संस्था आहे.

या संस्थेचा उद्देश्य हा  शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्या सोबतच  झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे. या संस्थेने औरंगाबाद मधील धोंदलगाव आणि वर्धा मधील आमला ही गावे दत्तक घेतली आहेत. या फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील ५०० तरुणांना व ३० महिलांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. संस्थेची कार्यालये महाराष्ट्रात  ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे संस्थेची कार्यालये असणार आहेत.

स्थापनेपासून दोनच आठवड्यांत मदतीचा ओघ सुरू झाला व  साडेसहा कोटी रुपये संस्थे मध्ये जमा झाले. संस्थे चे मुख्यालय पुणे येथे आहे.

Q. मकरंद अनासपुरे यांची पत्नी कोण आहे? (Who is wife of makarand Anaspure?)

मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीचे नाव शिल्पा अनासपुरे आहे.

Q. मकरंद अनासपुरेचे वय किती आहे? (What is the age of makrand Anaspure?)

४९ वर्ष

Q. मकरंद अनासपुरे यांची एकूण संपत्ती किती आहे? (Makarand Anaspure net worth)

Makarand Anaspure net worth जवळपास 05 – 10 दशलक्ष.

Leave a Comment