राकेश झुनझुनवाला बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी, नेटवर्थ। Rakesh Jhunjhunwala Biography, Age, Height, family, wife, Net worth

Spread the love

राकेश झुनझुनवाला परिचय (Rakesh Jhunjhunwala Introduction)

Table of Contents

भारतीय शेअर मार्केट चे बादशाह ज्यांना भारताचे वॉरेन बफेट असेहि म्हंटले जाते त्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा जन्म दिनांक  ५ जुलै १९६० साली तेलंगणा मधील हैदराबाद येथे एका मारवाडी परिवारात झाला. राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज होते. त्यांचे वडील राधेश्याम झुनझुनवाला हे भारत सरकार मधील आयकर विभागात अधिकारी होते आणि तसेच ते शेयर मार्केट मध्ये निवेशकहि होते.

राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केट मधील बिगबुल असेही ओळखले जायचे. राकेश झुनझुनवाला ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात, त्याची किंमत वाढत जाते असा बाजारातील सर्व लोकांचा एक अनुभव आहे. ज्या शेअरला ते हात लावतील त्यात प्रॉफिट कमावण्याची ताकद होती. म्हणून त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे.

ते हंगामा मीडिया आणि अँपटेक ते चेअरमन होते तसेच व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.

२००८ साली हर्षद मेहता घोटाळा प्रकरणा वेळी त्यांचे नाव चर्चेत आल होत.

राकेश झुनझुनवाला बायोग्राफी | Rakesh Jhunjhunwala  Biography in Marathi

नाव –  राकेश झुनझुनवाला

टोपण नाव – बिग बुल , भारताचे वॉरेन बफेट

व्यवसाय – स्टॉक मार्केट निवेशक, उद्योजक

जन्मतारीख – ५ जुलै १९६०

जन्मदिवस – मंगळवार

जन्म स्थळ – हैदराबाद  ( तेलंगणा , भारत )

वय – ६२ वर्ष 

मृत्यू – १४ ऑगस्ट २०२२

मृत्यू दिवस  – रविवार

नागरिकत्व / राष्ट्रीयता – भारतीय

जन्म रास (Sun Sign) – कर्क

धर्म – हिंदू

राकेश झुनझुनवाला कोण आहेत? Who is Rakesh Jhunjhunwala?

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज होते.

राकेश झुनझुनवाला फॅमिली | Rakesh Jhunjhunwala Family

आईचे नाव – उर्मिला झुनझुनवाला

वडिलांचे नाव – राधेश्याम झुनझुनवाला

भाऊ – राजेश झुनझुनवाला ( मोठा भाऊ )

बहीण – दोन आहेत पण  माहिती अवैलेबल नाही

वैवाहिक स्तिथी – विवाहित

पत्नी – रेखा झुनझुनवाला

मुले –   मुले – एकूण ३ ( मुलगी – निष्ठा झुनझुनवाला, जन्म – ३० जून २००४ 

           दोन जुळी मुले – आर्यमन झुनझुलवाला व  आर्यवीर झुनझुनवाला , जन्म – २००४ )

Rakesh Jhunjhunwala Physical Stats

उंची –  १५६ सेमी

वजन – ( अंदाजे ) ८४ किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – पंढरा

राकेश झुनझुनवाला नेट वर्थ | Rakesh Jhunjhunwala Net Worth

नेट वर्थ  – अंदाजे 5.8 अरब डॉलर ( १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत )

राकेश झुनझुनवाला हे देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ४८  व्या क्रमांकावर तर जगात ४३८ व्या क्रमांकावर होते.

राकेश यांनी मुंबईत ३७१ कोटी रुपये गुंतवून एक इमारत विकत घेतली जिथे ते ड्रीम होम बांधणार होते. महापालिकेकडून त्यासाठी परवानगी देखील त्यांनी मिळवली होती.

राकेश झुनझुनवाला शिक्षण | Rakesh Jhunjhunwala  Education

महाविद्यालय –  साइडेंहम कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स , मुंबई

                       द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया.

राकेश झुनझुनवाला यांनी सिडेनहैंम कॉलेज, मुंबई येथून  कॉमर्स विषयात  ग्रॅड्युएशन  केलं. त्या नंतर १९८५ मध्ये इंस्टिट्यूट ऑफ़ चार्टेड अकाउंटेंट ऑफ इंडिया मधून सी. ए. पूर्ण केल.

भारतातील स्टॉक मार्केटचे बिगबुल | Big Bull of Indian stock market

राकेश झुनझुनवाला हे भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील एक दिग्गज निवेशक होते. भारताचे वॉरेन बफेट म्हणून त्यांना ओळखलं जायचं. बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि म्हणूनच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक हे मालामाल होतात असं म्हटलं जायच.

झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये जास्त इंटरेस्ट होता. राकेश यांनी १९८५ साला पासून शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात केली. शेअर बाजाराचं बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाले होते.  सुरुवातीला त्यांनी ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये या भांडवलाची किंमत ११ हजार कोटी रुपये झाली होती. पण आज त्यांच्या पोर्टफोलिओत जवळपास 39500 कोटी रुपये आहेत.

त्यांनी टायटन, क्रिसिल, प्राज उद्योग, ऑरोबिंदो फार्मा, एनसीसी, अँपटेक लिमिटेड, आयन एक्सचेंज, एमसीएक्स, फोर्टिस हेल्थकेअर, लुपिन, व्हीआयपी इंडस्ट्रीज, जिओजित वित्तीय सेवा, रॅलिस इंडिया, जुबिलंट लाईफ सायन्स अशा बऱ्याच  कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती . झुनझुनवाला हे देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत  ४८ व्या क्रमांकावर तर जगात ४३८ व्या क्रमांकावर होते.  राकेश झुनझुनवाला हे एक उद्योजक असून ते सीए पण होते.

राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या देखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार आहेत.

राकेश झुनझुनवाला आणि चित्रपट सिनेमा | Rakesh Jhunjhunwala and cinema

राकेश यांनी  शेअर बाजार सोबत हिंदी  चित्रपटांमध्येही  पैसे गुंतवले होते आणि इथेही त्यांना चांगला फायदा झाला होता. २०१२ मध्ये श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा पैसे गुंतवले होते व त्या नंतर २०१६ मध्ये ‘की एंड का’ आणि २०१५ मध्ये ‘शमिताभ’ मध्येही त्यांनी पैसे गुंतवले होते.

राकेश झुनझुनवाला मृत्यू | Rakesh Jhunjhunwala  Death

१४ ऑगस्ट २०२२ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यूचे कारण कार्डियक अरेस्ट असं सांगितल जात. १४ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना मुंबईमधील ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत आणि थोड्या वेळातच  डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. मृत्यू समयी त्यांचं वय हे ६२ वर्षे होतं. राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत.

भारताच्या राष्ट्रपती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, द्रौपदी मुर्मू जीवन परिचय

नुकतीच काही दिवसांपूर्वी आपली  एअरलाईन अकासाची सुरूवात केली होती. झुनझुनवाला स्वस्त दरात विमानसेवा देणार अशी चर्चा सर्वत्र होती. अकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. पुढच्या चार वर्षात ७० विमानं खरेदी करुन अकासा हवाई कंपनी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने व्यापारी जगताला मोठा धक्का बसलायं.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर  शोक व्यक्त केल.  सर्व व्यापारी वर्ग, भारतीय शेअर बाजार आणि सर्व थरातून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज होते.

FAQs

राकेश झुनझुनवाला चा जन्म कधी झाला? Rakesh Jhunjhunwala birth date.

५ जुलै १९६० साली तेलंगणा मधील हैद्राबाद येथे.

राकेश झुनझुनवाला कोण आहेत? Who is Rakesh Jhunjhunwala?

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज होते.

राकेश झुनझुनवाला यांचा मृत्यू  कधी झाला? Rakesh Jhunjhunwala death

१४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे.

राकेश झुनझुनवाला यांचे निधन कसे झाले? How Rakesh Jhunjhunwala passes away?

राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्टच्या पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राकेश झुनझुनवाला यांना काय त्रास होत होता? What was Rakesh Jhunjhunwala suffering from?

राकेश झुनझुनवाला यांच निधन हे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झाले. ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांच्या म्हणण्यानुसार, “झुनझुनवाला याना किडनीच्या तीव्र आजाराने देखील ग्रासले होते, ते जुनाट डायलिसिसवर होते आणि ते चांगले प्रतिसाद देत होते. त्यांना मधुमेह होता आणि नुकतीच त्यांची शस्त्रक्रिया पण झाली होती.

Leave a Comment