धर्मवीर आनंद दिघे जीवन परिचय | Anand Dighe Biography in Marathi | Anand Dighe wiki, Bio, Wife, Height & Weight

Spread the love

आनंद दिघे परिचय | Anand Dighe Biography in Marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईट वर इथे आज आपण जाणून घेणार आहोत एका ढाण्या वाघाची माहिती ज्यांचे नाव आहे धर्मवीर आनंद दिघे.”

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.  या पक्षाची स्थापना हि १६ जून १९६६ रोजी पूजनीय “बाळासाहेब ठाकरे” यांनी केली. ज्याची धुरा आता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. परप्रांतीय, परराज्जीय लोकांकडून मराठी माणसांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. शिवसेनेच्या आक्रमक शैली मुळेच हा पक्ष लोकांच्या प्रथम पसंतीस उतरला. बाळासाहेबांची हि सेना सांभाळली ती काही निष्ठावान नेत्यांनी. धर्मवीर आनंद दिघे हे त्यातीलच एक निष्ठावान नेते होते.

आनंद दिघे  माहिती | Anand Dighe Information

नाव                   –           आनंद दिघे  

टोपण नाव          –           धर्मवीर आणि दिघे साहेब

कार्यक्षेत्र             –           राजकारण

राजकीय पक्ष      –           शिवसेना

जन्मतारीख         –           २७ जानेवारी १९५१

मृत्यू                   –           २६ ऑगस्ट २००१  

मृत्यूचे कारण      –           ह्रदयविकाराचा झटका

जन्मदिवस       –       बुधवार

छंद                  –            कॅरम खेळणे

राहण्याचे ठिकाण –         टेम्बीनाका, ठाणे, महाराष्ट्र ( भारत )

नागरिकत्व         –           भारतीय

जन्म रास           –           कुंभ  

धर्म                   –           हिंदू

आनंद दिघे फॅमिली। Anand Dighe Family

आईचे नाव – माहिती उपलब्ध नाही

वडिलांचे नाव     –           चिंतामणी दिघे

बहीण                –           अरुणा दिघे

वैवाहिक स्तिथी –             अविवाहित  

Anand Dighe Physical Stats

वजन                –           ८५  किलो

डोळ्यांचा रंग    –           ब्राऊन

केसांचा रंग      –           ब्राऊन

आनंद दिघे – जन्म आणि वास्तव्य Anand Dighe Birth and Birth place

धर्मवीर दिघे साहेब यांचे संपूर्ण नाव ” आनंद चिंतामण दिघे ” असे होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात झाला.

ते ठाण्यातील टेंबिनाका येथे राहत असत. दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. शिवसेनेचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी शिवसेना ठाण्यात घरा घरात पोहोचाविण्याचे कार्य हे या साहेबांनीच केलं.

आनंद दिघे यांचे खाजगी जीवन आणि इतर माहिती | Anand Dighe’s personal life – wife, height, weight

दिघे साहेबांनी स्वतःला समाज कार्यात इतके झोकून दिले होते कि संपूर्ण आयुष्य ते अविवाहित राहिले. त्यांची उंची बद्दल माहिती पाहावयास मिळत नाही. त्यांचे वजन ८५ किलोच्या दरम्यान होतं.

राजकारणातील प्रवास | Anand Dighe’s career in politics

ठाण्यात भरणाऱ्या सर्व सभा संमेलनात ते उपस्थित राहत. बाळासाहेबांचे वक्तृत्व, भाषाशैली यांना आकर्षित होऊन त्यांनी आपलं जीवन शिवसेनेला वाहून द्यायचं ठरवलं. अगदी सत्तरच्या दशकात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत करत अल्पावधीतच ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख झाले.  त्यांची लोकप्रियता आणि कामाची निष्ठा पाहता बाळासाहबांचे अगदी जवळचे मावळे झाले होते. ते बाळासाहेबांना आपले गुरु मनात.

ठाण्यासारख्या एका मोठ्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता मिळाला होता. दिघे यांची मेहनत पाहून शिवसेनेने ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती.

आनंद दिघेंच कार्य | Work of Anand Dighe and more

साहेबांच टेंबी नाक्यावरच घर म्हणजेच ” आनंद आश्रम “. आपल्या राहत्या घरीच ते जनतेच्या तक्रारीचा आढावा घेत असत. दररोज सकाळी जनता दरबार भरायचा. आपल्या तक्रारी सांगण्यासाठी ठाण्यातील जनता दुरून दुरून येत असे. साहेबांचा दरारा इतका होता कि जनतेला नाहक त्रास देण्याची कोणाचीही हिम्मत होत नसे. सदैव लोकांच्या हाकेला ते धावत असत. पोलीस आणि प्रशासन सगळ्यांमध्ये त्यांचा धाक होता त्यामुळे न्यायासाठी हिंसेचाहि वापर करायला ते मागेपुढे पाहत नसत.

धर्मवीर प्रवास

त्यांना धर्मकार्यात अत्यंत रुची होती. टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सव असो किंवा ठाण्यातील कृष्णजन्माष्टमीतील दहीहंडी या सगळ्याची सुरुवात आनंद दिघेंनीच केली. ठाण्यातील टेंबी नाक्यावर स्थापन केलेली अंबे संस्था अजूनही नवरात्र उत्सव आयोजित करते. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना बाळासाहेबांनी ” धर्मवीर “ हि उपाधी दिली.

आनंद दिघेंच निधन | Death of Anand Dighe

एकदा कामानिमित्त जात असताना त्यांच्या जीवाला अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता कि यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला लागलीस त्यांना जवळच्या सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. बातमी समजताच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले. लोकांच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती आता सुधारू लागली होती कि अचानक एक वाईट बातमी आली. आनंद दिघे ह्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

या अचानक आलेल्या बातमीने शिवसैनिक संतापले त्यांचा विश्वासच या बातमीवर बसेना. धर्मवीर दिघेसाहेब आपल्यातून अचानक कसे निघून गेले म्हणून रुग्णालयावर शंका उपस्थित करून त्यांनी सिंघानिया रुग्णालयाला आग लावली.

मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ‘शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येला बाळासाहेब ठाकरेच जबाबदार होते,’ असा बिनबुडाचा आरोप केला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंचे सगळे आरोप फेटाळून लावले होते. त्यावेळी आनंद दिघेंवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जोरदार घमासान सुरू झालं होतं.

आनंद दिघें चित्रपट। Anand Dighe Movie

स्व. दिघे साहेबांच्या आयुष्यावर आधारित ” धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे ” नावाचा एक मराठी चित्रपट ज्याची निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती तो चित्रपट दिनांक १३ मे २०२२ रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आनंद दिघें यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. या चित्रपटाला मुंबई व ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील एकनाथ शिंदेंचे कामहि प्रशंसनीय होते.

आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. त्यांची दैदिप्यमान कारकीर्द २६ ऑगस्ट २००१ रोजी संपली. निधनाच्या 20 वर्षांनंतरही ठाण्यातले शिवसैनिक आनंद दिघेंचं नाव आदराने घेतात. त्यांचं नाव माहित नसणारा एकही माणूस ठाण्यात आढळण शक्य नाही. दिघे साहेब यांच्या कार्याला मनाचा मुजरा.

मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे नक्की खाली कमेंट द्वारे कळवा.

FAQs

आनंद दिघेंचा जन्म कुठे झाला? Where was Anand Dighe born?

धर्मवीर दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात झाला.

आनंद दिघे यांचा जन्म कधी झाला? When was Anand Dighe born?

धर्मवीर दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ साली झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कसे झाले? How did Balasaheb Thackeray died?

ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Leave a Comment