द्रौपदी मुर्मू जीवनी | Draupadi Murmu Biography in Marathi

Spread the love

द्रौपदी मुर्मू प्रस्तावना | Brief about Draupadi Murmu

Table of Contents

Draupadi Murmu with her daughter

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा जन्म मयूरगंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात दिनांक २० जून १९५८ रोजी झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै २०२२ रोजी मतदान झाले आणि द्रौपदी मुर्मू या बहुमतांनी विजयी झाल्या.

द्रोपदी मुर्मू ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तीन महापुरुषांना खूप पसंत करतात आणि त्यांना आपला आदर्श मानतात.

द्रोपदी मुर्मू परिवार । Draupadi Murmu Family

मुर्मू यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू (Biranchi Narayan Tudu) आहे. त्यांचे वडील पंचायती राज प्रणाली अंतर्गत गाव प्रमुख होते. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते. १९७९ साली भुवनेश्वराच्या रमादेवी महिला विद्यापीठातून त्यांनी कला शाखेत पदवी घेतली. त्यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. त्यातील सध्या त्यांची एकच मुलगी जिवंत असून इतर दोनही मुलांचे निधन झालेले आहे, शिवाय पतीचेही निधन झालेले आहे.

द्रौपदी मुर्मूचा जीवन परिचय – माहिती। Draupadi Murmu Information – Biography in Marathi

पूर्ण नाव                        :             द्रौपदी मुर्मू

वडिलांचे नाव                :              बिरांची नारायण टुडू

व्यवसाय                       :              राजनीतिज्ञ

पार्टी                             :             भारतीय जनता पार्टी

पति                              :              श्याम चरण मुर्मू

जन्म तिथि                     :               २० जून १९५८

वय                               :               ६४ वर्ष

जन्म स्थान                    :               मयूरभंज, उड़ीशा (ओरिसा ), भारत

वजन                            :               ७४ किलो

उंची                              :              ५ फूट ४ इंच

जात                              :             अनुसूचित जनजाति

धर्म                               :              हिंदू

मुलगी                           :             इतिश्री मुर्मू

राजकीय पक्ष                 :             भारतीय जनता पार्टी

द्रोपदी मुर्मू शिक्षण। Draupadi Murmu Education

मुर्मू यांचे शालेय शिक्षण त्यांच्याच विभागातील एका विद्यालयात झाले. पुढे ग्रॅड्युएशन पर्यंत च्या अभ्यासा साठी त्या भुवनेश्वर येथे गेल्या. भुवनेश्वर येथील रामा देवी महिला कॉलेज मध्ये त्यानी एडमिशन घेतले आणि तिथेच ग्रॅड्युएशन पूर्ण केले.

द्रोपदी मुर्मू जाती। Draupadi Murmu caste

मुर्मू ह्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.

राष्ट्रपती पदाची निवडणूक २०२२ | Draupadi Murmu Presidential of India Election 2022

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential of India Election 2022) १८ जुलै २०२२ रोजी मतदान झाले आणि द्रौपदी मुर्मू या बहुमतांनी विजयी झाल्या. त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 64.03% मते मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा २८ पैकी २१ राज्यांमध्ये (पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशासह) ६,७६,८०३ इलेक्टोरल मतांनी (एकूण ६४.03%) पराभव करून बहुमत मिळवले.

शपथविधी झाल्यानंतर त्या अधिकृतपणे भारताच्या राष्ट्रपती बनल्या. नरेंद्र मोदी यांनीही मुर्मू यांना विजया बद्दल अभिनंदन केले.

भाजपा प्रणित राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) ने द्रौपदी मुर्मूला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या नावाची आदीकृत घोषणा केली होती.

सपा चे ओम प्रकाश राजभर, रघुराज प्रताप सिंह उर्फ ‘राजा भैया’, बीएसपी नेता उमा शंकर सिंह आणि सपा विधायक शिवपाल सिंह यादव समेत विपक्षी पार्टी च्या अनेक नेत्यांनी मुर्मू यांना समर्थन दिले होते..

यात एनडीए कडून लढणाऱ्या द्रौपदी यांची टक्कर हि संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी होती. दोन्ही दिग्गज उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना भेटून आपल्यास मत देण्यासाठी प्रयत्न केले होते.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे भारतामधील बहुतांश राज्य सरकारातील आमदार आणि लोकसभा व राज्यसभेतील खासदार यांमध्ये बहुमत असल्याने या निवडणुकीत त्यांची राष्ट्रपती बनण्याची शक्यता आधिच जास्त होती..

द्रौपदी मुर्मू यानी निवडणूक जिंकून त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून गौरविल्या गेल्या . यापूर्वी प्रतिभादेवी सिंह पाटील या एकमात्र महिला राष्ट्रपती झालेल्या होत्या. . प्रतिभाताई ह्या २००७ पासून २०१२ पर्यंत भारताच्या राष्ट्रपती होत्या.

सुरुवातीची कारकीर्द | Draupadi Murmu Starting career

राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मूनि आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक शिक्षिका म्हणून केली होती. १९७९ ते १९८३ पर्यंत सिंचन आणि विद्युत विभागात ज्युनियर असिस्टंट म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर १९९४ ते १९९७ पर्यंत त्यांनी ऑननेरी असिस्टंट टीचर म्हणूनही काम केले.

द्रौपदी मुर्मू मागील एकूण प्रवास | Draupadi Murmu previous offices

१९९७ मध्ये त्या रायरंगपूर नगर पंचायत मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाल १८ मे २०१५ ते १२ जुलै २०२१ पर्यंत होता.

मुर्मू ह्या बीजेडी आणि बीजेपी गठबंधन सरकार मध्येहि मंत्री होत्या. २००२ ते २००४ पर्यंत त्यांनी राज्यात बरीच पदे भूषविली होती. त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. त्या २००० ते २००४ आणि तसेच २००४ ते २००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदार संघातील आमदार होत्या.

याच कालखंडात २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने ” सर्वोत्कृष्ट आमदार ” म्हणून देण्यात येणार “नीलकंठ पुरस्कार ” देऊन त्यांचा सत्कार केला. २०१३ ते २०१५ या दोन वर्षाच्या कालखंडात त्यांनी  भाजपाच्या आदिवासी मोर्च्याच्या राष्ट्रीय कार्यकारीणी मध्ये काम केलं.

द्रौपदी मुर्मू संपत्ती | Draupadi Murmu Net worth

राष्ट्रपती पदासाठी नामांकन भरताना द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयोगा समोर दिलेल्या माहिती नुसार Draupadi Murmu यांची NET Worth 950000 रुपये आहे. यात रोख रक्कम सुमारे १.८ लाख भारतीय रुपये, fixed deposit 5.5 लाख भारतीय रुपये, १.३ लाख इन्शुरन्स पॉलिसी, दागिने २.६ लाख भारतीय रुपयात, आणि इतर छोट्या स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे.

अधिक माहिती साठी वाचा Wikipedia

तुम्ही हे सुद्धा वाचू शकता कंगना राणावत बायोग्राफी

 1. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कुठे झाला? (Where is Draupadi Murmu born?)

  द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मयूरगंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात दिनांक २० जून १९५८ रोजी झाला.

 2. द्रौपदी मुर्मू यांच्या मुलीचे नाव काय? (Who is the daughter of Draupadi Murmu?)

  इतिश्री मुर्मू (Itishri Murmu)

 3. द्रौपदी मुर्मू यांच व काय? (What is the age of Draupadi Murmu?)

  द्रौपदी मुर्मू यांचा जन्म दिनांक २० जून १९५८ रोजी झाला. त्यांच सद्याचे वय हे ६४ वर्ष (२०२२ पर्यंत) आहे.

 4. द्रौपदी मुर्मू धर्म – जात| (Draupadi Murmu religion cast)

  मुर्मू ह्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.

 5. द्रौपदी मुर्मू कोण आहेत? (Who is Draupadi Murmu?)

  द्रौपदी यांनी २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.