प्राजक्ता (Prajakta Mali) हि मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातली प्रसिध्द अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट सृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणूनही प्राजक्ताला ओळखले जाते. प्राजक्ताने वेगवेगळ्या मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. प्राजक्ता तशी मूळची पुण्याची असून तिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. प्राजक्ताचे शिक्षण हि पुण्यात च झाले आहे.
अप्रतिम निखळ सौंदर्य, दमदार अभिनय कौशल्य आणि नृत्यकला अंगी असणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ताने मराठी मनोरजंन क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे.
प्राजक्ताची मराठीसोबत बॉलीवूड मध्ये सुद्धा काम करण्याची खूप इच्छा आहे. ती एक डान्सर आहे स्वतः नृत्यदिग्दर्शक करायची इच्छा तिने बोलून दाखवली होती. ती ओशोची भक्त आहे त्यांच्या कडून आपल्याला कायम प्रेरणा मिळते अस तिचं म्हणणं आहे म्हणून तिने ओशो या नावाचा टॅटू काढून आपल्या हातावर गोंदवून घेतलेला आहे.
प्राजक्ता माळी बायोग्राफी (Prajakta Mali Biography in Marathi)
नाव – प्राजक्ता माळी
टोपण नाव – प्राज
व्यवसाय – मराठी अभिनेत्री
जन्मतारीख – ८ ऑगस्ट १९८९
जन्मदिवस – मंगळवार
जन्म स्थळ – पुणे ( महाराष्ट्र , भारत )
वय – ३३ वर्षे ( २०२२ पर्यंत)
नागरिकत्व – भारतीय
धर्म – हिंदू
प्राजक्ता माळी फॅमिली (Prajakta Mali Family)
आईचे नाव – श्वेता माळी
वडिलांचे नाव – ( माहिती अस्तित्वात नाही )
भाऊ किंवा बहीण – ( माहिती अस्तित्वात नाही )
वैवाहिक स्तिथी – अविवाहित
प्राजक्ताच्या काही आवडीच्या गोष्टी | Prajakta Favorite Things
अभिनेता – इरफान खान
अभिनेत्री – दीपिका पदुकोन
क्रिकेटर – एम. एस. धोनी
गायक – यो यो हनी सिंग
प्राजक्ता – शारीरिक माहिती | Prajakta-Physical Stats
उंची – १६५ सेमी
वजन – ५८ किलो
डोळ्यांचा रंग – गडद तपकिरी
केसांचा रंग – काळा
प्राजक्ता माळी नेटवर्थ | Prajakta Mali Net Worth
Prajakta Mali Net Worth – २० लाख ते ५० लाख डॉलर
प्राजक्ता माळी शिक्षण | Prajakta Mali Education
प्राजक्ता माली यांचे प्राथमिक शिक्षण कॅप्टन शिवराम पंत दामले प्रशाला येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण ललित कला केंद्र येथे झाले आहे.
प्राजक्ता माळी उंची | Prajakta Mali Height
प्राजक्ता माळी यांची उंची १६५ सेमी सेमी इतकी आहे.
प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम | Prajakta Mali on Instagram
प्राजक्ताच्या माळी इंस्टाग्राम (Prajakta Mali Instagram) अकाउंट वर १७ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
प्राजक्ता माळी फेसबुक | Prajakta Mali on facebook
प्राजक्ताच्या फेसबुक अकाउंटवर १० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
प्राजक्ता माळी ट्विटर | Prajakta Mali on Twitter
प्राजक्ता माळीच्या ट्विटर अकाउंट वर जवळपास २७ हजार फॉलोअर्स आहेत.
प्राजक्ता माळी नवरा – विवाह | Prajakta Mali husband name / wedding
प्राजक्ता माळी सध्या तरी अविवाहित आहे.
प्राजक्ता माळी वय | Prajakta Mali age
प्राजक्ता माळी हिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ झाला असून तिचे सध्याचे वय ३३ वर्ष (२०२२ पर्यंत) आहे.
प्राजक्ता माळी मराठी मालिका / टी. व्ही. सीरिअल्स लिस्ट | Prajakta Mali T. V. Serials list
जुळून येती रेशीम गाठी’ ह्या मराठी मालिकेमुळे प्राजक्ताच्या आयुष्यास वेगळी कलाटणी मिळाली. या मालिकेतील तिची नायिकेची भूमिका अगदी घराघरांमध्ये पोहोचली. प्राजक्ताने भूमिका केलेल्या मराठी मालिका.
वर्ष मालिका वाहिनी
२०११-१२ सुवासिनी स्टार प्रवाह
२०१३-२०१५ जुळून येती रेशीमगाठी झी मराठी
२०१७ नकटीच्या लग्नाला यायचं हं झी मराठी
२०१८ – महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी
२०२० मस्त महाराष्ट्र झी मराठी
प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. तसेच मस्त महाराष्ट्र या नव्या ट्रॅव्हल शोचेही ती संचालन करते आहे.
नृत्य आणि अभिनय या दोन्ही मध्ये पारंगत असलेल्या प्राजक्ताने पुणे नवरात्र महोत्सव, शनिवार वाडा महोत्सव, पुणे पोलिस कर्तव्य मेळावा या आणि अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपल्या कला गुणांचं प्रदर्शन केलेल आहे.
प्राजक्ता माळी movies लिस्ट | Prajakta Mali movie list
२००७ साली प्राजक्ता माळीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. संजय सुरकर यांच्या ‘तांदळा एक मुखवटा’ या सिनेमात प्राजक्ताने सर्व प्रथम काम केले. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘सुवासिनी’ या मालिकेत सावीची भूमिका उत्तम पणे साकारली. तिची हि भूमिका प्रकाशझोतात आली आणि हळू हळू तिला प्रसिद्धी मिळू लागली.
वर्ष चित्रपट
२०१३ – खो – खो
२०१४ – संघर्ष
२०१७ – हंपी
२०१८ – आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर
२०१८ – पार्टी
२०१९ – डोक्याला शॉट
२०२१ – लॉकडाऊन
२०२१ – वाय
आपण हे पण वाचू शकता …..
प्राजक्ता माळी वेब सिरीज । Prajakta Mali Web series
अभिनेत्री प्राजक्ता व तेजस्विनी पंडित यांची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही नवीन मराठी वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’व सुरु झाली आहे. या सीरिज मध्ये तिने केलेल्या बोल्ड भूमिके मुळे ती जास्त चर्चेत आहे. प्राजक्ता आणि तेजस्विनी या दोघींची ‘रानबाजार’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यासाठी काही लोकांना तिला ट्रोल केले आहे.
रानबाजार मध्ये रत्ना हि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमीका अभिनेत्री प्राजक्ताने साकारली आहे. प्राजक्ताने रत्नाच्या भूमिकेसाठी आपले वजन वाढवत 61 किलो केले होते. योगा व डाएटच्या माध्यमातून तिने आपले वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. पुढे फक्त सहा महिन्यामध्येच प्राजक्ताने तब्बल 11 किलो वजन घटवले आहे. प्राजक्ताच टार्गेट वजन 51 किलोपर्यंत घेऊन जाण्याच आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ताचे नाव घेतले जाते.
प्राजक्ता – मराठी नाटक | Prajakta – Drama in Marathi
प्राजक्ताने ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘शिवपुत्र शंभूराजे’ यांसारख्या मराठी नाटकातहि अभिनय केला आहे.
मित्रानो तुम्हाला प्राजक्ता बद्दल ची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा.
FAQs
प्राजक्ता माळी वय काय? How old is Prajakta Mali /Prajakta Mali age?
प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ झाला असून तिचे सध्याचे वय ३३ वर्ष (२०२२ पर्यंत) आहे.
प्राजक्ता माळी नवरा? (Prajakta Mali husband name)
प्राजक्ता सध्या तरी अविवाहित आहे.
प्राजक्ता माळी आता कुठे आहे? Where is Prajakta Mali now?
प्राजक्ता हि वैभव ताटवाड्यासोबत सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग मध्ये बिझी आहे.