डॉ. ए पी जे कलाम (About APJ Abdul Kalam Biography in Marathi)
डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr APJ Kalam) यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. डॉ कलाम हे भारताचे सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक होते. २००२ ते २००७ पर्यंत ते भारताचे अकरावे राष्ट्रपती राष्ट्रपती देखील होते, त्यांना “मिसाईल मॅन”म्हणून ओळखले जायचे. भारतरत्न या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कारानेहि त्यांना सन्मानित केले होते.
डॉ. ए पी जे कलाम कुटुंब (Dr APJ Abdul Kalam family)
डॉ कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले. वडील जैनुलाब्दीन हे होडीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते. त्यांचे वडील बोटीतून हिंदू यात्रेकरूंना रामेश्वरमवरून धनुषकोडीला घेऊन जात. त्यांच्या आईचे नाव आशिअम्मा असे असून त्या गृहिणी होत्या. कलाम हे त्यांच्या कुटुंबातील एकूण चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होते.
एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस (Apj abdul kalam birthday)
डॉ कलाम यांचा (Apj abdul kalam birthday) जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या पंबन बेटावरील रामेश्वरम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला
डॉ. कलाम शिक्षण (Dr APJ Abdul Kalam Education)
शालेय जीवनात डॉ. कलाम हे अभ्यासामध्ये अगदी सामान्य होते. त्यांनी आपले शिक्षण रामनाथपुरम येथील श्वार्टज मॅट्रिक स्कूल मधून पूर्ण केले आणि नंतर पुढील शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे अपुरे होते म्हणून बहिणीने आपले दागिने गहाण ठेऊन पैसे उभे केले. १९४४ साली भौतिकशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली.नंतर ते 1955 मध्ये मद्रासला गेले, तिथे त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करून सन १९६० मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अभियांयांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी D.R.D.O. जॉईन केले.
भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम, हे एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेस समर्पित केले. एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये देशाला जागतिक दर्जा दिला, तर एक राष्ट्रपती म्हणून त्यांनी लाखो भारतीयांना स्वप्न पाहण्याची आणि त्या स्वप्नाची पूर्तता कशी करायची याची प्रेरणा दिली.
डॉ.अब्दुल कलाम यांची कामगिरी (Dr. APJ Abdul Kalam Performance)
१९६९ मध्ये ISRO मध्ये त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पहिले. भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV III) आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) तयार करण्यात डॉ कलाम यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या मोहिमेत त्यांच योगदान मोठ होत. जुलै १९८० मध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या तैनात करण्यात त्यांच्या मेहनतीचा वाटा होता.
१९८० मध्ये, भारत सरकारने आधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू करण्याचा विचार केला. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) कलाम यांच्या मुख्य कार्यकारीकक्षात सुरू करण्यात आला. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार अग्नी क्षेपणास्त्र, पृथ्वी सारखे क्षेपणास्त्र बनवण्यात यश आले.
कलाम यांनी जुलै १९९२ ते डिसेंबर १९९९ या कालावधीमध्ये पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव म्हणून काम पहिले.
अब्दुल कलाम यांनी पहिला पगार कसा मिळवला? (How did Abdul Kalam earn his first wages?)
डॉ. कलाम यांनी आपल्या भावाला चालत्या ट्रेनमधून फेकलेले वृत्तपत्रांचे बंडल पकडण्यात मदत करून पहिला पगार मिळवला होता.
ए पी जे अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान ( Dr APJ Kalam Awards)
१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम
दुसऱ्या क्रमांकावर होते.
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम विचार (Dr. APJ Abdul Kalam quotes in Marathi)
१. स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत.
२. य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
३. जर तुमचा जन्म पंखानिशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात त्या पंखानी उडायला शिका.
४. जर तुम्ही सुर्यासारखे चमकू इच्छिता तर पहिले सुर्यासारखे तपावे लागेल.
५. तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदललात तर भविष्य नक्कीच बदलेल.
६. जीवनात कठीण वेळ येणे महत्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे.
७. वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही बरं.
८. देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते.आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते.
९. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.
१० तुम्ही तुमच भविष्य बदलू शकत नाही सवयी बदलू शकता.
अब्दुल कलाम यांचा अंत (APJ Abdul Kalam Death date)
दिनांक २७ जुलै २०१५ रोजी वयाच्या 83 व्या वर्षी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) शिलांग येथे व्याख्यान देत असताना हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.
29 जुलैच्या सकाळी, कलामचे पार्थिव शरीर भारतीय ध्वजात लपेटून त्यांचा जन्मस्थानी रामेश्वरम शहरात नेले गेले. रामेश्वरम येथे पोहचल्यावर त्यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
30 जुलै २०१५ रोजी पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह ३,५0,000 हून अधिक लोकांनी शेवटचा सलाम केला.
डॉक्टर अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय? (Full name of APJ Abdul Kalam)
डॉक्टर अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे.
डॉ अब्दुल कलाम यांचे जन्मगाव काय? (Abdul kalam Birth Place)
डॉ अब्दुल कलाम यांचे जन्मगाव तामिळनाडूच्या पंबन बेटावरील रामेश्वरम हे आहे.
अब्दुल कलाम जन्म, मृत्यू व वय | APJ Abdul Kalam Birthday, Death and Age
डॉ कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला व मृत्यू दिनांक २७ जुलै २०१५ रोजी वयाच्या 83 व्या वर्षी झाला.
अब्दुल कलाम कशासाठी प्रसिद्ध होते? (What is Dr Abdul Kalam famous for?)
भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली.
एपीजे अब्दुल कलाम कोण आहेत? (Who is apj abdul kalam?)
डॉ कलाम हे भारत या महान देशाचे राष्ट्रपती होते.तसेच एक प्रमुख भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली होती.
अब्दुल कलामचे घर कुठे होते? (Where was abdul kalam house?
अब्दुल कलाम यांचे घर रामेश्वरममधील मस्जिद रस्त्यावर होते. (Abdul Kalam’s house was on the Mosque Street in Rameswaram)