तापसी पन्नू  बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Beautiful actress Taapsee Pannu Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

तापसी पन्नू  (Taapsee Pannu)

Table of Contents

तापसी पन्नू (Taapsee Pannu) हि एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट विश्वात  स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. १ ऑगस्ट १९८७ मध्ये दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात तापसीचा  जन्म झाला. तापसी ला पुस्तके वाचणे, बाइक चालवणे, स्क्वॅश खेळणे आणि नृत्य करणे आवडते.

हिंदीत डेब्यू करण्यापूर्वी तापसीने दाक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीत पाऊल ठेवले होते. तिथे तिने भरपूर सिनेमे केले. पुढे २०१३ मध्ये ‘चश्मेबद्दूर’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘चश्मेबद्दूर हा कॉमेडी सिनेमा होता आणि तो तिकीट खिडकीवर बऱ्या पैकी फ्लॉप झाला. त्यानंतर तपसीला हिंदी सिनेमात लवकर मोठी संधी मिळाली नाही. तापसीने हिंदीसह कन्नड, तामिळ, तेलुगू आदी भाषांमध्ये काम केले आहे.

तापसी पन्नूला मॉडेलिंगची आवड असल्याने कॉलेजमध्ये असल्यापासून ती मॉडेलिंग स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यातूनच तिला अनेक जाहिरातींची कामे मिळाली. वर्ष २००८ मध्ये मॉडेलिंग दरम्यान तापसीने पँटालून फेमिना मिस फ्रेश फेस आणि साफी फेमिना मिस ब्यूटिफूल स्किनचा किताब पटकावला होता. पुढे तिला चित्रपटात काम करण्याची आवड निर्माण झाली. २०१० मध्ये तापसीने मॉडेलिंग सोडून अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ‘झामुंडी नादम’ हा तेलुगू सिनेमा तिच्या करिअरचा पहिला सिनेमा ठरला.

तापसी पन्नू  बायोग्राफी | Taapsee Pannu Biography in Marathi

नाव                   –           तापसी पन्नू

टोपण नाव          –           मैगी,

व्यवसाय            –           अभिनेत्री आणि मॉडेल

जन्मतारीख         –           १ ऑगस्ट १९८७

जन्मदिवस          –           शनिवार

जन्म स्थळ          –           नवी दिल्ली (भारत)

वय                    –           ३५ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व          –           भारतीय

जन्म रास           –           सिंह

धर्म                   –           हिंदू

तापसी पन्नू  फॅमिली । Taapsee Pannu Family

आईचे नाव          –          निर्मलजीत पन्नू

वडिलांचे नाव      –          दिलमोहन सिंह पन्नू

बहीण                 –          शगुन पन्नू

वैवाहिक स्तिथी   –           अविवाहित

बॉयफ्रेंड             –           महत राघवेंद्र (तामिळ फिल्म अभिनेता)  

तापसी पन्नूच्याकाहीआवडीच्यागोष्टी  | Taapsee Pannu Favorite Things

अभिनेता           –           आमिर खान, ऋतिक रोशन, सूर्या, रणबीर कपूर, प्रभास आणि रॉबर्ट डाऊनी                  जुनियर

अभिनेत्री           –          प्रियांका चोपडा आणि प्रियामणी

स्थळ                –           युरोप आणि मालदीव

छंद                  –          वाचणे, बाईक चालवणे, स्क्वॅश खेळणे, डान्स करणे.

तापसी पन्नू शारीरिक आकडेवारी | Taapsee Pannu Physical Stats

उंची                 –           १६५ सेमी

वजन                 –          ५५ किलो

डोळ्यांचा रंग   –           भुरा

केसांचा रंग      –           काळा

तापसी पन्नू नेटवर्थ | Taapsee Pannu Net Worth

Taapsee Pannu Net Worth (नेट वर्थ)  – ६ मिलियन डॉलर (2022 पर्यंत )

तापसी पन्नू शिक्षण  | Taapsee Pannu Education

तापसी पन्नू हिने आपले सुरुवातीचे शिक्षण हे अशोक विहार येथील जय माता कौर पब्लिक स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर गुरु तेग बहादूर इन्सिट्टयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्यूटर सायन्स मध्ये बी टेक ची पदवी मिळवली. इंजिनिअरिंग नंतर पुढे  तिला एम बी ए करायचे होते. परंतु, आपल्या आवडीचे कॉलेज न मिळाल्यामुळे तापसीने एम बी ए करायचा विचार सोडला आणि एका कंपनीत कामाल लागली. जेमतेम ६ महिने तिथे काम केले आणि मॉडेलिंगची आवड असल्याने नोकरी सोडून मॉडेलिंगला सुरुवात केली.

तापसी पन्नू आणि मॉडलिंग | Taapsee Pannu modeling

ग्रॅज्युएशन नंतर तापसी पन्नूने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायला सुरुवात केली, पण त्यात ती रमली नाही. नंतर तिने मॉडेल बनण्याचा विचार केला, पुढे तापसी पन्नूने अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला. मॉडेलिंगमध्ये, तापसी पन्नूने अनेक पारितोषिके जिंकली. फेमिना मिस इंडिया स्पर्धा आणि साफी फेमिना मिस ब्युटीफुल स्किन यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. नंतर तापसी पन्नूने मॉडेलिंगमधीलहि आपले करिअर सोडले कारण तिला वाटले की ती मॉडेलिंगद्वारे आपली ओळख निर्माण करू शकत नाही, त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

तापसी पन्नू मुव्हीज | Taapasee Pannu Movies

पुढे मॉडेलिंगनंतर, तापसी पन्नू हिने २०१० साली तेलुगू चित्रपट झुम्मंडी नादममधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे, तमिळ चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळू लागल्या जिथे तिने २०११ साली वंदन वेंद्रन या चित्रपटातून तमिळ चित्रपटात पदार्पण केले.

Taapasee Pannu Movies list

  • झुमांडी नादम (तेलुगू) 
  • आडूकलम (तामिळ) 
  • वस्तादू ना राजू (तेलुगू) 
  • मि. परफेक्ट (तेलुगू) 
  • वीरा (तेलुगू) 
  • वनधान वेनद्राण (तामिळ) 
  • मोगुडू (तेलुगू) 
  • डबल्स (मल्याळम) 
  • दारुवू (तेलुगू) 
  • गुंडेलू गोडारी (तेलुगू) 
  • चश्मेबद्दूर (हिंदी) 
  • शॅडो (तेलुगू) 
  • शासम (तेलुगू) 
  • आरंभम (तामिळ) 
  • कथई थिराईकथाई वसानम लयक्कम (तामिळ) 
  • बेबी (हिंदी) 
  • कंचना 2 (तामिळ) 
  • वै राजा वै (तामिळ) 
  • डोंगात्ता (तेलुगू) 
  • पिंक (हिंदी) 
  • रनिंग शादी (हिंदी) 
  • द गाझी अटॅक (हिंदी) 
  • नाम शबाना (हिंदी) 
  • अनांदो ब्रह्मा (तेलुगू) 
  • जुडवा 2 (हिंदी) 
  • दिल जंगली (हिंदी)
  • सुरमा (हिंदी) 
  • मुल्क (हिंदी) 
  • नेवेव्वारो (तेलुगू) 
  • मनमर्जिंया (हिंदी) 
  • बदला (हिंदी) 
  • गेम ओव्हर (तेलुगू) 
  • मिशन मंगल (हिंदी) 
  • सांड की आंख (हिंदी) 
  • थप्पड (हिंदी) 
  • हसीन दिलरुबा (हिंदी) 
  • अन्नाबेल सेतूपथी (तामिळ) 
  • रश्मी रॉकेट (हिंदी) 

पुरस्कार तापसी पन्नू | Taapsee Pannu Awards

२०१३ – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (जूरी) – संतोषम फिल्म पुरस्कार

२०१४ – सर्वात उत्साही कलाकार – एडिसन पुरस्कार

२०१७ – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री   – जूरी विशेष पुरस्कार – जागरण फिल्म समारोह

२०१८ – असाधारण प्रभाव पुरस्कार – महिला – झी  सिने पुरस्कार

२०२० – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (क्रिटिक्स) – ६५वां फिल्मफेयर पुरस्कार

२०२० – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (क्रिटिक्स) – २६वां स्क्रीन पुरस्कार

२०२० – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (क्रिटिक्स) – झी सिने अवार्ड्स

२०२० – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री – आनंद विकटन सिनेमा पुरस्कार

२०२१ – सर्वश्रेष्ठ अभिनेत्री – ६६वां फ़िल्मफ़ेयर पुरस्कार

तापसी पन्नू उंची  | Taapsee Pannu Height

तापसी  यांची उंची १६५ सेमी इतकी आहे.

तापसी दोबारा चित्रपट | Taapsee and film Dobaaraa

दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kahsyap) याचा नवा चित्रपट ‘दोबारा’ (Dobaaraa) नुकताच रिलीज झाला होता . ‘दोबारा’ हा चित्रपट २०१८ च्या स्पॅनिश चित्रपट ‘मिराज’चे अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट #बायकॉटदोबारा (#bycotdobaaraa) म्हणून चर्चेत आहे.

तापसी पन्नू आयकर (Taapsee Pannu income-tax)

४ मार्च २०२१ रोजी, पुण्यात दोबारा चित्रपटाचे शूटिंग करत असताना अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी करचुकवेगिरीच्या चौकशीचा भाग म्हणून चौकशी केली होती

तापसी पन्नू वय आणि उंची (Tapsee Pannu age and Height)

तापसी पन्नू  वय – ३५ वर्ष (२०२२ पर्यंत). तापसी  यांची उंची १६५ सेमी इतकी आहे.

तापसी पन्नूचे खरे नाव काय आहे? (What is the real name of Taapsee Pannu?)

Tapasee Pannu

तापसी पन्नूचा जन्म कधी झाला? (When was Taapsee Pannu born?)

१ ऑगस्ट १९८७ मध्ये दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात तापसीचा जन्म झाला.

तापसी पन्नू आयटियन आहे का? (Is taapsee Pannu is an iitian?)

No.

तापसी पन्नू कुठे राहते? (Where does Taapsee Pannu stay?)

अंधेरी (मुंबई)

तापसी पन्नू विवाहित आहे का?(Is Taapsee Pannu married?)

No

Leave a Comment