सई ताम्हणकर माहिती
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे २५ जुन १९८६ रोजी झाला सई ताम्हणकर ही एक सुंदर आणि मादक अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी काम काम केल्यामुळे लवकरच प्रसिद्ध झाली. ती एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणूनहि तिची चर्चा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत केली जाते.
सई ताम्हणकर जीवन चरित्र | Sai Tamhankar Biography in Marathi
नाव – सई ताम्हणकर
टोपण नाव – –
व्यवसाय – अभिनेत्री
जन्म तारीख – २५ जून १९८६
जन्म दिवस – बुधवार
जन्म स्थळ – सांगली, महाराष्ट्र
भाषा – मराठी, हिंदी, इंग्लिश
राशी – वृषभ
नागरिकत्व – भारतीय
वांशिकता – –
खायची आवड – चिकन आणि पास्ता
सई ताम्हणकर फॅमेली | Sai Tamhankar Family
आई – मृणालिनी ताम्हणकर
वडील – नंदकुमार ताम्हणकर
सईचे शिक्षण | Education of Sai Tamhankar
शाळा – सावरकर प्रतिष्टान, सांगली –
कॉलेज – चिंतामण महाविद्यालय
शैक्षणिक पात्रता – ग्रॅजुएट
सई ताम्हणकर वय | Sai Tamhankar age
सई ताम्हणकर हिचा जन्म २५ जून १९८६ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय ३६ वर्ष (२०२२) आहे.
सई ताम्हणकर चा नवरा, सईचे प्रेम संबंध -Sai Love Affair
वैवाहिक स्थिती – घटस्फोटित
प्रियकर – भरत तख्तानी (व्यावसायिक)
पतीचे नाव – अमेय गोसावी (Amey Gosavi)
सईच्या आवडीच्या गोष्टी Favorite Things –
अभिनेता – दिलीप कुमार, आमिर खान,
अभिनेत्री – अनुष्का, काजल
जेवण – इंडियन फूड, फास्ट फूड, राजमा, भेंडी, चोकोलेट्स
छंद – dancing
आवडीचे ठिकाण – मॉरिशियस
रंग – सफेद, काळा, पिवळा
सई ताम्हणकर Physical Stats
उंची – १७० cm
वजन – ६० kg
डोळ्यांचा कलर – तपकिरी
केसांचा कलर – काळा
सई ताम्हणकर चा नवरा, लग्न व घटस्फोट | Sai Tamhankar husband name, Marriage & Divorce.
अमेय गोसावी (Amey Gosavi) या व्हिज्युअल इफेक्ट कलाकाराबरोबर सईने १५ डिसेंबर २०१३ साली लग्न केले होते. अमेय हा एक प्रोड्युसर असून चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केलेल नाही. सई आणि अमेय यांचा प्रेमविवाह होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र काही काळानंतर, २०१५ साली या दोघांनेही घटस्फोटाचा निर्णय घेतला.
सई ताम्हणकर चित्रपट | Sai Tamhankar Movies
सई एक उत्कृष्ठ अभिनेत्री असून ती चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेतला होता. तिने मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील, या गोजिरवाण्या घरात, अग्नि शिखा, सती रे आणि कस्तुरी सारख्या सीरिअल्स मध्ये हि चांगल्या भूमिका केलेल्या आहेत.
२००८ मध्ये, सनाई चौघडे या चित्रपटातून सईने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
२००८ मध्ये सईने सुभाष घईच्या क्राईम थ्रिलर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मुख्य भूमिका साकारत बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. यासोबतच सईने आमिर खानच्या गजनी या हिंदी चित्रपटात देखील चांगली भूमिका केली होती. सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नो एंट्रीच्या मराठी रिमेकमध्ये सईची भूमिका गाजली होती. यामधील तिच्या रेड बिकीनीची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे सई यांना मराठी चित्रसृष्टीतील पहिली बिकिनी गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं.
परंतु २०१३ साली प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशी सोबतच्या “दुनियादारी” या चित्रपटातील भूमिकेमुळे सईला मराठी चित्रपटसृष्टीत खरी नवी ओळख मिळवून दिली.
चला तर मग पाहुयात सईच्या मराठीतल्या आणि हिंदीतल्या चित्रपटांची यादी.
मराठी चित्रपट : वर्ष
पिकनिक : 2008
हाय काय….नाय काय : 2009
बे दुणे साडे चार : 2009
अजब लग्नाची गजब गोष्ट : 2010
मिशन पॉसिबल : 2010
रिटा : 2010
दोन घडीचा डाव : 2011
झकास : 2011
राडा रॉक्स : 2011
पुणे ५२ : 2012
गाजराची पुंगी : 2012
धागेदोरे : 2012
अघोर : 2012
नो एंट्री पुढे धोका आहे : 2012
अशाच एका बेटावर : 2012
बाबुरावला पकडा : 2012
बालक-पालक : 2013
झपाटलेला २ : 2013
दुनियादारी : 2013
टाईम प्लीज : 2013
पोरबाजार : 2014
पोस्टकार्ड : 2014
गुरू पौर्णिमा : 2014
सौ. शशी देवधर : 2014
प्यारवाली लव्ह स्टोरी : 2014
क्लासमेट : 2015
हंटर : 2015
तू हि रे : 2015
३:५६ किल्लारी : 2015
वाय झेड : 2016
जाऊंद्या ना बाळासाहेब : 2016
फॅमिली कट्टा : 2016
वजनदार : 2016
राक्षस : 2016
हिंदी चित्रपट : वर्ष
ब्लॅक ॲन्ड व्हाईट : 2008
गजनी : 2008
व्हिला : 2012
सई ताम्हणकर पुरस्कार – Sai Tamhankar Awards and Recognitions
सईने विविध सिनेमात वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तिला अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे.
झी गौरव – मधील सर्वाधिक नैसर्गिक कामगिरी (सन २०१५)
संस्कृती कला दर्पण – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गुरुपौर्णिमा (सन २०१५)
फेमिना पॉवर लिस्ट महाराष्ट्र – २०१५ मधील सर्वात शक्तिशाली महिला
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री क्लासमेट २०१५ – एनआयएफएफ मराठी(सन २०१५)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – न्यूजमेकर अचिव्हर्स (सन २०१५)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – महाराष्ट्र चा फेवरिट कोन २०१५
२०१५ मध्ये फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर दोनदा वैशिष्ट्यीकृत होणारी पहिली मराठी अभिनेत्री.
एमएफके २०१८ – आवडता लोकप्रिय चेहरा
एमएफके २०१८ – आवडती अभिनेत्री
महाराष्ट्र अचिव्हर्स पुरस्कार २०१८ – इंटरटेनर ऑफ द ईअर
टाईम्स पॉवर वूमन अवॉर्ड – मराठी सिनेमा तरुण अचिव्हर्स पुरस्कार
महाराष्ट्र कुस्ती दंगल २ नोव्हेंबर २०१८ ला झी तर्फे सुरु झाली. झी च्या या प्रोफेशनल कुस्ती लीग स्पर्धे मध्ये “कोल्हापुरी मावळे” टीम ची सई मालकीण आहे.
अशा प्रकारे आपण सई ताम्हणकर यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली. हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट द्वारे नक्की कळवा. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना पण शेयर करा.
धन्यवाद
FAQs
सई ताम्हणकर चा नवरा कोण आहे? (Husband of Sai Tamhankar)
अमेय गोसावी (Amey Gosavi)
सई ताम्हणकर यांची कन्या कोण आहे? (Daughter of Sai Tamhankar)
खुशी हजारे (Khushi Hajare)
सई ताम्हणकर कुठली आहे? (Where is Sai tamhankar from?)
सांगली.
सई ताम्हणकर वय किती? (Sai Tamhankar age)
सई ताम्हणकर हिचा जन्म २५ जून १९८६ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय ३६ वर्ष (२०२२) आहे.
1 thought on “सई ताम्हणकर (अभिनेत्री) बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती, नेटवर्थ आणि इतर | Bold and Beautiful actress Sai Tamhankar Biography in Marathi – Age, Height, Boyfriend, Family & More”